न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- दोघांनी हातचलाखी करून महिलेच्या दागिन्यांच्या जागी रुमालामध्ये माती ठेवून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. ही घटना (दि. २४/०९/२०२३) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास माणिक चौक, चाकण येथे घडली.
घडलेली हकीकत अशी, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला व काळ्या रंगाची पँट घातलेला अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका इसमाने फिर्यादी महिलेकडे पाचशे रुपये मदत मागितली. तसेच दुसरा इसम अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे याने काही कारण नसताना फिर्यादीचा विश्वास संपादन करीत त्याच्या रूमालामध्ये महिलेला दागिने ठेवण्यास भाग पाडले. तो रुमाल पुन्हा फिर्यादीकडे दिला. त्यानंतर ते दोन्ही इसम निघून गेले.
फिर्यादी यांनी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर रूमाल उघडून पाहिला असता. त्यामध्ये फिर्यादीला दागिने न दिसता माती मिळून आली. याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चाकण पोलिसांनी ७९० / २०२३ भादवि कलम ४०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा निघोट पुढील तपास करीत आहेत.











