न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. हे प्रलंबित खटले असल्याचे उमेदवार बारणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.
नियमभंगाचे तीन गुन्हे पुढीलप्रमाणे :-
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी अकरा वाजून ५ मिनीट ते १ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघन. समाजात दंगा पसरविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० जुलै २०१३ रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन दरम्यान पिंपरी-चिंचवड घर बचाव कृती समितीतर्फे निगडी ते विधान भवन पदयात्रा. या पदयात्रेत बारणे यांचा सहभाग. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बेकायदेशीर आंदोलन. गुन्हा दाखल.
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट २०१२ रोजी पावणे बाराच्या सुमारास उर्से टोलनाका महामार्गावर बेकायदा वाहने अडवून जमावबंदीचा आदेश झुगारला. १५ फेब्रुवारी २०१६ रोजी बारणे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले.










