- अॅड. सागर चरण यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) प्रत्येक वॉर्डात ढेकूण व झुरळांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या ढेकूण व झुरळांचे साम्राज्य वाढले असून याकडे वेळीच लक्ष न दिल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही प्रशासन विभाग, वैद्यकीय विभाग व अन्य विभागांकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावातील आणि शहरी भागातील रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा दक्षता समितीचे मा. सदस्य अॅड. सागर चरण यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.















