- सतरा लाखांचे ३५ महागडे मोबाईल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिवसा चोरीबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सकाळच्या सत्रात सतर्क पेट्रोलींग व सक्त नाकाबंदी करुन संशयीतरित्या फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेवुन चो-यांवर आळा घालण्याबाबत आदेश दिले आहेत.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार हे सकाळच्या सत्रात होणाऱ्या चोरीच्या अनुषंगाने सिसीटीव्हीच्या आधारे तपास करीत होते. एक इसम व एक महीला दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असे चोरी करणारे संशयीत असल्याचे त्यांना दिसुन आले. त्यादृष्टीने तपास सुरु केला असताना सिसीटीव्ही मधील संशयीत इसम हा ताथवडे भागातील बालाजी लॉ कॉलेजवळ येणार आहे. अशी बातमी मिळाली. सदर ठिकाणी जावून सिसीटीव्ही फुटेज मधील संशयीत इसम आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. १) कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (वय २० वर्षे रा. अमर पंजाबी ढाब्याचे मागे, वडगाव मावळ ता. मावळ जि.पुणे; मुळ रा.शास्त्री नगर, जवाहरनगर, ता.जि.नडीयाद राज्य गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
त्याला पोलीस स्टेशन येथे आणुन झडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल मिळुन आले. त्यामुळे त्याच्या साथीदार महीलेचा शोध घेवून तीला ताब्यात घेतले. तीच्याकडे देखील दोन मोबाईल मिळुन आले. त्यांना अटक करुन एकत्रीत तपास केला असता आरोपींनी दाखल गुन्हया व्यतिरीक्त चिंचवड, निगडी, खडक, भारती विदयापीठ असे पोलीस स्टेशनचे मिळुन एकुण ०६ गुन्हयांची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेले किं.रु. १७,००,००० चे एकुण ३५ महागडे मोबाईल त्यांच्याकडुन जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि-२, डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना.राम तळपे, पोशि.अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळून केली आहे.















