- ठेकेदारासह भागीदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- अकराव्या मजल्यावर सेट्रींगचे सामान आणायला मयत कामगार राम नरेश यादव (वय ४१ वर्षे) हा गेला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो प्लबिंगच्या डक्टमध्ये पडला. त्यावेळी नवव्या मजल्यावर सेफ्टी जाळी लावली होती. त्या जाळीवर पडुन तो जाळीसह खाली बिल्डिंगच्या दुस-या मजल्यावरील प्लबिंगच्या डक्टमध्ये पडुन त्याच्या मेंदुला मार लागल्याने मयत झाला.
पोलिसांनी सदर जाळीची पाहणी केली असता सदर जाळी ही निकृष्ट दर्जाची झाली असुन ती पुर्णपणे व्यवस्थित ताईट लावलेली नसल्यामुळे सदर मयत इसम हा त्या जाळीवर पडल्यावर तेथे अडकुन राहीला नाही तो जाळीसहीत खाली गेला. तसेच ठेकेदार यांनी १२ व्या मजल्यावर काम चालु होते त्यावेळेस फक्त ९ व्या मजल्यावरील डक्टमध्ये एक निकृष्ठ दर्जाची जाळी लावलेली होती. त्याचा वेळोवेळी कोणत्याही प्रकारे मेंटेनन्स केला नाही. ठेकेदार यांनी आणखीन दोन-तीन जाळया प्लबिंगच्या डक्टमध्ये बसविणे गरजेचे होते. सदरच्या जाळया हया न बसविल्यामुळे यातील मयत कामगार हा बिल्डिंगच्या दुस-या मजल्यावरील डक्टमध्ये पडुन मयत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०३) रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास थेरगांव येथील बांधकामं साईटवर घडला. १) ठेकेदार जितेंद्र बाळकृष्ण कोतकर (रा. शॉप नं. ५, सोपानबाग सोसायटी जवळ, पंचवटी, पाषाण, पुणे) व २) त्यांचे पार्टनर रणजित दिलीपराव बनकर यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात १०१०/२०२३ भा.द.वि. कलम ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा रावते पुढील तपास करीत आहेत.















