- माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- मोशी परिसरातील भारत माता चौक ते लक्ष्मी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
महापालिकेत गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवकच नसल्याने प्रभागातील विविध कामे प्रलंबित आहेत. त्यानंतरही प्रभागातील नागरिक आजही माजी नगरसेवकांकडे कामे घेऊन जात आहेत. मोशी परिसरातील भारत माता चौक ते लक्ष्मी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीसह या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्याकडे प्रश्न मांडला. बोराटे यांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.















