न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- दरवर्षी प्रमाणे यंदा देखील प्राधिकरणमधील प्रख्यात नवचैतन्य भजनी मंडळाला पिंपरी चिंचवडमधील अनेक मंदिरांमध्ये स्त्री सूक्त आणि भजने म्हणण्यासाठी नवरात्रीत निमंत्रित केले आहे.
भजनी मंडळातील सर्व महिला सदस्यांनी उत्साहाने भाग घेऊन भाविकांची मने जिंकली. दुर्गेश्वरी मंदिरात देवीचा जागर केला गेला. अंबे मातेची सेवा देताना निरनिराळी सरस भजने सादर केली. गोंधळाचा, जोगव्याचा ही समावेश होता. माधुरी ओक यांनी गोंधळ व जोगवा अतिशय उत्तम सादर केला. ज्योती कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने कार्यक्रम नेटकेपणाने प्रस्तुत केला.
माजी नगरसेवक गावडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम अगदी सुरेख झाला. भजनी मंडळातील सर्व महिलांचा चहापान देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


















