न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहु वार्ताहर (दि. २४ ऑक्टोबर २०२३) :- वै. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी दि. २ नोव्हेंबर ते बुधवारी दि. ८ नोव्हेंबर दरम्यान या फिरत्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन ह.भ.प.शिताराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. पहाटे ४ वा. ते ७ वाजेपर्यंत काकड आरती, सकाळी ८ ते ११ या वेळेत गाथा पारायण होईल तर प्रवचन सेवा हसनापुर, कोळगाव येथील महाराजांची होईल.
कीर्तन सेवा सप्ताहभर ह.भ.प.राजाराम महाराज काटे आळंदी देवाची, ह.भ.प.भागवत महाराज चवरे आंबेकर आजरेकर फंड मठाधिपती, पंढरपूर, ह.भ.प. राम महाराज झुंझुर्के श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आखेगाव, ह.भ.प.माणिक महाराज ढाकणे ज्ञानेश्वरी आश्रम हसनापुर कोळगाव, रामायणाचार्य “श्रीनिवास महाराज घुगे”, आळंदी (देवाची), ह.भ.प.श्री ज्ञानेश्वरी कंठभुषण “ज्ञानेश्वर महाराज कुराडे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांची तसेच “गुरुवर्य ह.भ.प. शांतीब्रम्ह मारुती बाबा कुरेकर” यांचे काल्याचे कीर्तन होईल. तदनंतर महाप्रसादाने सांगता होईल.
सर्व भाविक भक्तांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे होणाऱ्या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प.माणिक महाराज ढाकणे, श्री संताजी महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.