न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२३) :- भांडवलदार कंपनीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी ॲग्रीकेटर कायद्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. यासाठी नुकताच पुणे, पिंपरीत बंद देखील पाळला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले. लवकरच ॲग्रीकेटर कायदा अमलात येईल, असे आश्वासन मिळाल्यामुळे दिवाळी दसरा सणासुदीच्या काळामध्ये बंद न करता कायदेशीर व सदनशिर मार्गाने (दि. २५) पुणे आरटीओ येथे एकत्र येऊन निदर्शने करून आरटीओला निवेदन देण्यात येणार आहे. यात कॅब, टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, मनसे चे किशोर चिंतामणी, बाळासाहेब शिंगाडे, जनता गॅरेजचे अध्यक्ष सचिन वैराट, टेम्पो बस संघटनेचे प्रकाश झाडे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, कुमार शेट्टी, अब्बास शेख, प्रवीण शिखरे, संतोष डंबाळे, संतोष दिवरे आदी उपस्थित होते
पुणे-मुंबई-चेन्नई-बेंगलोर-दिल्ली व देशातील विविध ठिकाणी भांडवलदार कंपनीबाबत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन वेगवेगळ्या पातळीवर सुरू असून या सर्व आंदोलनाची ताकत एकत्र करून एकत्रितपणे लढणे आता गरजेचे आहे. वेगवेगळ्या पद्धतीने लढा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी मी १ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र व देशव्यापी दौरा करणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मोठी सभा घेऊन आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल, असे कामगार नेते बाबा कांबळे म्हणाले.
आनंद तांबे म्हणले दिवाळीनंतर हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून सर्व संघटनांना विश्वासात घेऊन तसेच विश्वासात घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढण्यात येणार आहे, आनंद तांबे म्हणाले. सणासुदीच्या काळामध्ये होणाऱ्या बंदला पाठिंबा नाही, असे मनसेचे किशोर चिंतामणी आणि बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.