न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन वर्कशॉप व स्क्रॅप दुकानांमध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने चिखली पोलीस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे. चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने एका केलेल्या कारवाईत घरफ़ोडीच्या सराईत गुन्हेगारास जिल्हा बस्ती, उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली असून दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
या प्रकरणात चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर ६७६ / २०२३ भादवी कलम ३९४ ४५४, ४५७, ३८०, ३२४, ३२३. ३४,५११ हा गुन्हा दिनांक १५/१०/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आरोपी हा फिर्यादीच्या शॉपमध्ये घुसला. त्याना मारहाण करुन शॉपमध्ये ठेवलेला १,५०,००० रुपये किंमतीचा, २०० किलो वजनाचा, कार्बाईड इनसर्ट या नावाचा स्क्रॅब माल घरफोडी करुन चोरुन नेला होता. याच दुकानातून यापूर्वी देखील कार्बाईट इनसर्टचा स्क्रॅबचा ४६७ किलो वजनाचा ३,५०,००० रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन गुरजि.नंबर ६०४ / २०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे हा गुन्हा दाखल होता.
वरील दोन्ही गुन्हे हे सराईत आरोपींनीच केले असण्याची दाट शक्यता असल्याने चिखली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचा-यांनी परीसरातील २०-२२ ठिकाणची सिसिटिव्ही फुटेज चेक केली. त्याना सदरच्या गुन्हयातील आरोपी सनी रा. भोसरी हा असल्याचे व त्याने त्याचे ईतर साथीदाराच्या मदतीने सदरच्या घरफोड्या व जबरी चो-या केल्याचे तपासात समोर आले.
त्यानुसार तपास करून पाहिजे आरोपी संजय याचा मोबाईल फोन नंबरचा सीडीआर प्राप्त करुन त्यांचे तांत्रीक विश्लेषण केले असता आरोपी संजय हा उत्तरप्रदेश याठिकाणी असल्याचे लोकेशन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनचे पोलीसांचे पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले. त्याप्रमाणे आरोपी संजय, बस्ती, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेवुन त्याला चिखली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सखोल तपास केला असता त्याने कार्बाईट इनसर्टचा माल हा त्याचा मित्र सनी याच्यासोबत मिळुन चोरलेला असल्याचे सांगुन सदरचा माल जमशेर याच्या मार्फत औरंगाबाद या ठिकाणी विकला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांनी औरंगाबाद या ठिकाणी जावून गुन्हयातील २,७५,०५३ रुपये किमतीचा कार्बाईड इनसर्ट या नावाचे स्क्रॅच मटेरियल एकुण वजन ३६७ किलो. असा माल हस्तगत केलेला आहे. सदरचा माल हा चिखली पोलीस स्टेशन गु. रजि नंबर ६०४ / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
तसेच गुन्हयातील निष्पन्न आरोपी सनी, जमशेर यांना तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन तात्काळ अटक करण्यात आली असुन आरोपी सनी याने सांगितल्याप्रमाणे पिंपरी या ठिकाणाहून २२,४८३ रुपये किंमतीचे, ३० किलो, कार्बाईड इनसर्ट स्क्रॅब मटेरियल जप्त करण्यात आले आहे. सदरचा माल देखील चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर ६०४ / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
तसेच तपासात आरोपी सनी याने चिखली पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर ६७६ / २०२३ भादवी कलम ३९४, ४५४, ४५७, ३८० हाही गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्या गुन्हयातील रु.३७,५०० रुपये किंमतीचा, ५० किलो, कार्बाईड इनसर्ट चा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे..
अशा प्रकारे वरील आरोपींना अटक करून चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर ६७६/२०२३, भादवी कलम ३९४,४५४,४५७,३८० वगैरे व चिखली पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर ६०४/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आलेले असुन दोन्ही गुन्हयातील एकुण ३,३५,०३६ रुपये किंमतीचा ४४७ किलो कार्बाईड इनसर्ट माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी संदीप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, राजेंद्र गौर, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि / तौफिक सय्यद, पोउपनिरी / अमरदीप पुजारी, पोहवा /गर्जे, पोहवा / सावंत, पोहवा / नांगरे, पोहवा / तारळकर, पोहवा/साकोरे, पोहवा / नानेकर, पोहवा / शिंदे, पोहवा / मासाळ, पोहवा / मोहिते, पोना / कांबळे पोना / राठोड, पोना / पिंजारी, पोशि/ सकपाळ, पोशि/ भोर, पोशि/ नाईक यांनी यशस्वी रित्या पार पाडली, अशी माहिती चिखली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली.