न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आ. मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितले आहे.
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणालाच चॅलेंज देण्याचा हा प्रकार मिटकरी करत आहेत. सर्व जनतेच्या आणि खास करून वंचित, मागासवर्गीय जनतेच्या भावना दुखावणारी ही मागणी आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
अशा प्रकारची मागणी आपण पुन्हा केली तर, संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन उभे करून ठिकठिकाणी पुतळ्याचे दहन करण्यात येईल, असा इशारा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिला आहे.
तमाम हिंदू जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत.
मिटकरी यांनी त्वरित माफी मागून वादावर पडदा घालावा, असे आवाहन अमित गोरखे यांनी प्रसिद्धीसाठी सोशल मिडीयाद्वारे पाठविलेल्या मजकुरात केले आहे.