न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- सी.एम.ई.जी.पी. (चीफ मिनिस्टर एम्पलॉयमेंट जनरेशन प्रोग्राम / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) या योजनेतुन आरोपी यांनी वेळोवेळी फिर्यादी यांना तसेच फिर्यादीच्या नातेवाईकांना एक कोटीचे कर्ज मंजुर करून देतो व फिर्यादी यांच्या मुलीला नोकरीला लावतो, असे सांगुन वेळोवेळी फिर्यादीकडुन ४,०३,२४० एवढी रक्कम स्विकारली.
कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजुर न केल्याने तसेच फिर्यादी यांच्या मुलीला नोकरीला न लावल्याने त्यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपी १ व २ यांनी त्यांचे फोन बंद केल्याने त्यांची माहिती घेतली असता, आरोपी १ हा स्टेट बँके शाखा काळेवाडी तर आरोपी २ ह्या मुंबई मंत्रालयात कामाला नसल्याची माहिती समजली. त्यामुळे आरोपी १ व २ यांनी फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना दि. ०८/०५/२०२३ पासुन आजपर्यंत तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीत घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) राजेश रा. चिंचवड, २) महिला आरोपी रा. मुंबई यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ५५०/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२०,३४ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.