न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- दोघांनी आपआपसात संगनमत करून फिर्यादी यांना बिअरबार व परमीट रूमचे लायसन्स काढुन देतो, असे सांगुन आमिष दाखवले.
फिर्यादीकडुन दोघांनी १०.७५ लाख स्विकारले. त्या बदल्यात फिर्यादी यांना बिअरबार परमिट रूमचे कोणतेही लायसन्स न देता फिर्यादी यांची फसवणुक करून ९,५८,५०० रक्कमेचा अपहार केलेला आहे, असे फिर्यादीत नमुद आहे.
जानेवारी २०२३ ते दि २३/१०/२०२३ रोजी पर्यत गहुंजे स्टेडियमसमोरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.
फिर्यादी अनंता यांनी आरोपी १) नितीन, 2) राज यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीसांनी 549/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.