न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृती अभियानांतर्गंत ३३, मावळ लोकसभा मतदार संघातील, २०६, पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात मतदान जनजागृतीपर पथनाटयाचे व चित्ररथाचे उदघाटन मतदार नोंदणी अधिकारी डॉ. प्रविण आष्टीकर व तहसिलदार दिपक वजाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आज गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केलेल्या या चित्ररथाव्दारे व पथनाटयांव्दारे शहरातील विविध भागात मतदार जनजागृती करण्यात येत असून, विविध ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ. हेगडेवार भवन निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमास नायब तहसिलदार संजय कुलकर्णी, नोडल अधिकारी रमेश भोसले, प्रशासन अधिकारी दिलीप आढारी आदी उपस्थित होते.










