न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- नवरात्रोस्तोवानिमित्त ओम साई ग्रुप व सोमनाथ दादा तापकीर युवा मंच आयोजित भव्य गरबा व रास दांडिया कार्यक्रमाला काळेवाडी, रहाटणी येथील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
गरबा व दांडिया खेळणाऱ्यांना आयोजकांमार्फत रोज बक्षिसे वितरित केली जात होती. त्यामध्ये पैठणी, चांदीचा बिचवा, सोन्याची नथ व इतर अनेक बक्षिसांचा समावेश होता. होम मिनिस्टर स्पर्धेचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते.
ह्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे वर्षा दिगंबर यादव प्रथम, सुनंदा नामदेव शिरसाठ द्वितीय, अंजली संजय भोरे तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. स्पर्धे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी देखील उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केले. नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
नागरिकांचे सोमनाथ तापकीर यांनी आभार मानले.












