न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. हे सरकार निष्क्रिय असून मृत पावले आहे, अशी मराठा समाजाची ठाम खात्री पटली. तेव्हा या सरकारचा दशक्रिया विधी केला पाहिजे. या भावनेतून मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज प्रचंड संख्येने एकत्र आला.
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील स्मशानभूमीत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांचा संतप्त मराठा समाजाने दशक्रिया विधी कार्यक्रम केला. यावेळी दशक्रिया विधी करून सतीश काळे, नाना वारे तसेच रमेश कदम यांनी मुंडन करून शोक व्यक्त केला. याप्रसंगी मीरा कदम सुनिता शिंदे यांचे सहित उपस्थित अनेक महिला भगिनींनी प्रचंड मोठा आक्रोश केला. मराठा समाजाची फसवणूक करत असल्यामुळे सरकारला लाखोली वाहिली.
यावेळी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल शोकाकुल वातावरणात मराठा समाज कार्यकर्ते प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर, कल्पना गिड्डे, राजाभाऊ गोलांडे, काशिनाथ जगताप तसेच मानव कांबळे यांनी मृत महाराष्ट्र सरकार विषयी श्रद्धांजली वाहिली. मनोगते व्यक्त केली. सुरज भोईर व संपत पाचुंदकर यांनी पसायदान म्हटले. याप्रसंगी वैभव जाधव, नकुल भोईर, पांडुरंग प्रचंडराव, रेखा देशमुख, गणेश सरकटे, रत्नप्रभा सातपुते, अशोक सातपुते, प्रकाश बाबर, किरण खोत, संपतराव जगताप, संजय जाधव, सचिन पवार, ब्रह्मानंद जाधव, विष्णू कराळे, नलिनी पाटील, सुनील गव्हाणे, शितल घरात, रावसाहेब गंगाधरे, सुनील शिंदे, सागर चिंचवडे, सुरज भोईर, बाबा भोईर, जालिंदर खतकर इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्मशानभूमीत घाटावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.











