न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड व साबळे सुपरस्पेसिऍलिटी हॉस्पिटल भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रोस्टेट जागरूकता शिबिराचे उदघाटन, लायन्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष व साबळे सुपरस्पेसिऍलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ विलास साबळे सर, लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड चे अध्यक्ष ला. डॉ शंकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये ५० वर्ष व त्यावरील पुरुषामध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी, विविध शारीरिक तपासण्या व डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. आपल्या देशात लैंगिक आजारांकडे खूपच दुर्लक्ष केले जाते व त्यामुळे वयोवृद्ध लोकांना खूप कठीण आयुष्य जगावे लागते. म्हणून प्रोस्टेट च्या आजाराबद्दल जनजागृती व्हावी आणी वेळीच इलाज होऊन, ज्येष्ठाना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी या शिबिरात सवालतीच्या दरात तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये डॉ. विलास साबळे, सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ् व डॉ राहुल पाटील, मूत्ररोग तज्ञ् यांच्या हस्ते रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
सदर शिबिराच्या उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला. सुरेखा साबळे मॅडम यांनी केले व सदर शिबीर सर्वांसाठी 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर, सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत साबळे सुपरस्पेसिऍलिटी हॉस्पिटल भोसरी येथे चालू राहील असे सांगितले व गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सुधीर शाह, लक्ष्मण शिंदे, अभिमन्यू लोखंडे, विनायक कोरडे, व्यापारी तानाजी जाधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साबळे हॉस्पिटल चे ऍडमिन ऑफिसर संदीप पिसाळ व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. डॉ राहुल पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.











