- अध्यक्षपदी ॲड. प्रमिला हरीश गाडे यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनची सन २०२३-२४ ची सार्वत्रिक निवडणूक (दि. ३०) रोजी बिनविरोध पार पडली. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. बी. के. कांबळे यांनी काम पहिले. विविध पदांसाठी १३ फॉर्म आल्याने निवडणूक अधिकारी यांनी सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा नेहरूनगर कोर्ट आवारात केली.
कमिटीच्या अध्यक्षपदी इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष पदी ॲड. प्रमिला हरीश गाडे यांची बिनविरोध निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव म्हणून ॲड. अक्षय भगवान केदार, महिला सचिव ॲड. वर्षा मधुकर कांबळे, सहसचिव ॲड. श्रीराम राजाराम गालफाडे, खजिनदार पदी ॲड. ऐश्वर्या धर्मराज शिरसाठ, ऑडिटर पदी ॲड. संतोषी संजय काळभोर, तसेच सदस्य पदी ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चौरे, ॲड. विशाल आसाराम पौळ, ॲड. साक्षी भरत धुमाळ, ॲड. गीतावली मच्छिंद्र जाधव, ॲड. निलम सुनील जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार शहराला जादा कोर्ट मिळण्यासाठी, वकिलांच्या विविध समस्या, तसेच मोशी येथील जागेत लवकरच कोर्टाचे भूमिपूजन सोहळा पार पडणार असून जलदगतीने नविन कोर्टाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष. प्रमिला गाडे यांनी दिले आहे.















