न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ देहू नगरपंचायतीसह येलवाडी, सुदुंबरे गावात आज मंगळवारी शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. देहू नगरपंचायतीची सर्वसाधारण मासिक सभा तहकूब करण्यात आली. गावच्या वतीने बंद पाळण्यात येऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. आठवडे भाजीपाला बाजारही व्यापाऱ्यांनी बंद ठेवला. बंदच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.