न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कार्यालयात ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी (बुधवारी) झालेल्या छाननीमध्ये चार अपक्ष उमेदवारांच्या अर्जात त्रुटी असल्याने बाद झाले व २८ उमेदवार पात्र ठरले.
अर्ज माघार घेण्याची आज शुक्रवार (दि. १२) रोजी अंतिम मुदत होती. या मुदतीत सात उमेदवारांनी वैधपणे आपले उमेदवारी अर्ज निवडणुकीतून माघार घेतले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २१ उमेदवार स्पर्धेत आहेत. खरी लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यातच रंगणार आहे.
मावळमधील अर्ज माघार घेणारे उमेदवार :- गुणाट संभाजी नामदेव, भीमराव आण्णा कडाळे, जाफर खुर्शिद चौधरी, धर्मपाल तंतरपाळे, नुरजहॉ यासिन शेख, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, प्रकाश नैनूमल लखवाणी
तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून एकूण २६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी एकूण ३ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे स्पर्धेत २३ उमेदवार राहिले असून, खरी लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांच्यातच होणार, असे स्पष्ट चित्र आहे.










