न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२३) :- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ पुणे, चिंचवड विभागाचा दिवाळी कौटुंबिक स्नेह मेळावा दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. चिंचवड विभागातर्फे कौटुंबाला दिवाळी भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी चिंचवड विभागातर्फे विक्रेत्या बंधूंसाठी दहा लाखाचा अपघात विमा विभागातर्फे करण्यात आला. विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. चिंचवड विभागाचे चिंचवड विभाग प्रमुख मनोज काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांनी विक्रेत्यांना यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व प्रेस व्यवस्थापन, विक्रेते व बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत तांबे सर यांनी तर, विलास जंगम यांनी आभार प्रदर्शन केले.