न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२३) :- मावळातील टाटा मोटर्स कंपनी कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष नामदेव रामकृष्ण पायनाईक नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी टाटा मोटर्स कंपनीत तब्बल २९ वर्षे सेवा बजावली.
सन २०१८ ते आजपर्यत एकूण पाच वर्ष ते कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. त्या अगोदर त्यांनी खजिनदार, जनरल सेक्रेटरी या पदावर काम केले आहे. नुकताच त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त समारोप कार्यक्रम आकुर्डीत पार पडला.
यावेळी दिनेश advertising चे दिनेश लिंगवत, ए के चव्हाण, संजय शेटे, अमित पटांगळे, अनंत कडू, चंद्रकांत घाणेकर, विकास परकर, संदीप पोतनीस, सुनील पायनाईक, हिरालाल पटेल आणि मित्र मंडळी आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईसारख्या मोठ्या शहरातून येऊन त्यांनी मावळातील कंपनीत काम केले. कडक शिस्त आणि तब्बल अठरा तास सतत प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी कंपनीतील जबाबदार पदावर काम करून निगडीतील सुनील न्यूज पेपर एजन्सी देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.