- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक तीन दिवस होणार प्रभावित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ अंतर्गत (दि. ८ ते दि. ११) रोजी इंग्लंड विरुद्ध नेदरलँड व ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश हे क्रिकेट सामने होणार आहेत. दरम्यान प्रेक्षकांना वाहनांच्या पार्किंगसाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रेक्षकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था व मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
१) मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग..
(अ) द्रुतगती मार्गाच्या देहुरोड एक्झीट मधून डावीकडे वळावे. त्यानंतर तात्काळ परत डावीकडून वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डीगावाच्या बाजुस असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ब) द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहाने किवळे ब्रिजवरुन मुकाई चौक येथून यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिबॉसेस कॉलेच्या बाजुकडील असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
क) जुना मुंबई पुणे हायवे प्रेक्षकांची वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बंगलोर हायवे वरील मामुर्डी जकात नाका जवळील अडंरपास व रस्ताने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने शितलादेवी मंदीर येथून डाव्या बाजूस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
२) पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षाकाच्या वाहनांसाठी मार्ग खालीलप्रमाणे…
(अ) पुणे बंगलोर हायवेवरुन पवनानदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिज वरुन चाहने सावकाश डाव्या बाजुकडे वळवावी व २०० मिटर वरुन दुतगती मार्गाचे डाव्या बाजूचे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
(ब) निगडी, हॅगींग ब्रिज कडून येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चीफ मार्ग कृष्णा चौक येथून उजच्या बाजूस वळुन परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजुस वळुन असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
३) एम सी ए स्टडीयमकडून साईनाथनगर मार्गे येणारा जुना मुंबई पुणे महामार्गाकडे येणारा रस्ता हा एकतर्फी फक्त जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. साईनाथनगर मार्गे स्टेडीयमकडे देण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
टिप : १) सेंट्रल चौक साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौककडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी असेल.
२) मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यावर परत जाताना त्याचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल.