न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंब एकत्र येऊन दीपावलीचा सण साजरा करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.
पाडव्याला गोविंदबागेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आले असताना, दिवसभरात न फिरकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा गोविंदबागेत हजेरी लावली.
त्यानंतर भाऊबीज साजरी करण्यासाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार हे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी गेल्याने दिवाळीला एकत्र येण्याची पवार कुटुंबाची परंपरा कायम राहिली आहे.