न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) निगडी येथील पास केंद्राची मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी तोडफोड केली. याबाबतची तक्रार केंद्रप्रमुखांनी निगडी पोलिस ठाण्यात दिली.
निगडी येथील पवळे ब्रिजजवळ कंटेनरमध्ये पास केंद्र सुरू केले आहे. निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपच्या परिसरात नेहमीच गर्दुल्यांचा वावर असतो. या बस स्टॉपवर दिवसा मोबाइल चोरी, पाकीट चोरी होण्याच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत.
एका टोळक्याने मंगळवारी रात्री पास केंद्राच्या खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला आणि केंद्राचे मोठे नुकसान केले. बुधवारी सकाळी कर्मचारी कामावर आले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. तक्रार केंद्रप्रमुखांनी दिली आहे.