न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून मावळातील इंद्रायणी भात यंदा २८ रुपये किलो दराने खरेदी करणार असल्याची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी येळसे येथे केली.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून गेल्यावर्षी भात खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिकिलो २४ रुपये दराने गेल्यावर्षी भात खरेदी केला होता. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक माऊली दाभाडे, रेवणनाथ दारवटकर, संचालक प्रवीण शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध
देसाई, सचिन घोटकुले, साहेबराव कारके, संभाजी शिंदे, एकनाथ टिळे, माऊली ठाकर, नामदेवराव दाभाडे, विजय ठाकर, पांडुरंग कडू उपस्थित होते.
दुर्गाड यांनी बदलते तंत्रज्ञान वापरून जलदगतीने कर्जपुरवठा करण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे सांगितले. माऊली दाभाडे म्हणाले की, अतिशय चविष्ट, स्वादिष्ट इंद्रायणी भात शहरी भागात पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली. यंदा मावळबरोबर मुळशी तालुक्यातील भात खरेदी करणार आहोत. संजय मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव ठुले यांनी आभार मानले.