न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षा अश्विनी चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवार १८ नोव्हेंबर ते सोमवार २० नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अश्विनी चंद्रकांत तापकीर जनसंपर्क कार्यालय, बेबीज शाळेच्या शेजारी, तापकीर नगर काळेवाडी येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड, मतदान कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड काढणे व अपडेट करणे तसेच या सर्व कार्डचे स्मार्ट कार्ड काढून देण्यात येणार आहे.
ह्या शिबिराचे उद्घाटन शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष
कविता अल्हाट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या शिबिराचा रहाटणी काळेवाडी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अश्विनी तापकीर यांनी केले आहे.

















