न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवदुत, बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांकरता दिवाळी फराळ भेटवस्तू पाठविल्या आहेत. शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा मतदार संघात त्या भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले, भोसरी विधानसभेमध्ये उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व उपनेते इरफान भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिरूर लोकसभेचे मा. खासदार उपनेते आढलराव पाटील यांनी शिरूर लोसभेतील नागरिकांना तसेच शिवसैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी देखील नागरिक व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे, बळीराम जाधव, युवा सेना उपजिल्हाधिकारी अरुण जोखदंड, समन्वयक विशाल लांडगे, प्रदीप बालघरे, विभाग प्रमुख दिनकर जाधव, सुरेश सूर्यवंशी, सोमनाथ महाजन, संदीप जाधव, राहुल पिंगळे, सौरभ केंगार, अनिल सकट, अभिषेक तायनाथ, व शिरूर लोकसभेतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











