- झिका वायरसचा प्रतिबंध आरोग्य विभागाने ताबडतोब करावा – डॉ. प्रशांत कोळवले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- पुण्यात झिका व्हायरस पहिला रुग्ण सापडला आहे. ज्या महिलेला याची लागण झाली आहे, ती महिला पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमाला गेली होती. बहुतेक त्यांना तिथेच लागण झाली असावी, अशी शक्यता असू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली गेली पाहिजे, अशी मागणी आपचे डॉक्टर आघाडीचे प्रमुख, डॉ. प्रशांत कोळवले ह्यांनी केली आहे.
ह्या व्हायरसची लागण डास चावल्यामुळे होतो, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सोसायटी, नगरवस्ती, झोपडपट्टीमध्ये कीटकनाशक धुराची फवारणी तातडीने करण्यात यावी. त्याचप्रमाणे सांडपाणीचा साठा न होऊ देणे, गवत, कचरा याची विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे.
या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना ताप, उलटी, डोकेदुखी, अंगदुखी हे लक्षण दिसून येतात. त्यामुळे कोणालाही ही लक्षणे दिसून आल्यास लगेच उपचार करावेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी घरात धूप, धूराचा वापर करावा, अश्या सूचना डॉ. प्रशांत यांनी केल्या आहेत.