न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२३) :- यंदाची ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.
या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी किताब २०२३’ चा मानकरी ठरलेला गंगावेस तालमीचा पै. सिकंदर शेख यांनी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी पै. सिकंदर शेख यांना नाना काटे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी वस्ताद अर्जुन काटे, पोपटराव जगताप, पै. किशोर नखाते, पै. राकेश नखाते, किरण गुरव, प्रशांत पवार, हर्षद काटे, संग्राम चव्हाण, विशाल काळे, श्याम भोसले, शांताराम माने आदि उपस्थित होते.











