- वाहतूक पोलिसांकडून नगर मार्गावर जड/अवजड वाहनांना प्रवेश बंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- सकल मराठा समाजाची (दि. २०) रोजी ११.०० या महालक्ष्मी लॉन्स, पुणे नगर रोड या ठिकाणी सभा होणार असुन सभेकरीता मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. हा सभेकरीता अंदाजे दिड लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेकरीता येणार्या नागरीकांची वाहने एकाचवेळी नगर रोडवर येणार असल्याने संपूर्ण नगर रोडवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
तसेच दिपावली सणाच्या सुट्टया संपल्याने गावाहून परतणारे नागरीक (रिटनींग क्राऊड) यांच्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नगर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड बाजूकडून पुणे बाजूमार्गे नगर रोडवर जाणारी जड- अवजड वाहतूक वळविणे आवश्यक आहे. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
निगडी, तळवडे, भोसरी, चाकण वाहतुक विभाग अंतर्गत पिंपरी चिंचवड बाजूकडून पुणे बाजूमार्गे नगर रोडकडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग क्रः- १. जुना मुंबई पुणे हायवेवरून येणारी जड/अवजड वाहने भक्ती शक्ती चौक- मोशी टोल नाका- चाकण- शिक्रापुरमार्गे नगरकडे जातील.
पर्यायी मार्ग क्रः- २. पिंपरी चिंचवड परिसरातील जड / अवजड वाहने नाशिक फाटा भोसरी- चाकणमार्गे नगरकडे जातील.
अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड, पेट्रोल, डिझेल टँकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस, वगळून वाहतूक बदलाची अधिसुचना निर्गमित करण्यात आली आहे. नागरीकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.