न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी दोन पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवुन त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करुन घेतला.
त्यातुन मिळालेल्या रकमेतुन स्वतःची उपजिवीका भागवित असताना आरोपी पोलिसांना मिळुन आले. (दि. १९) रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे पोलिसांनी कारवाई केली.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५८७/२०२३ भा.द.वि.कलम ३७० (२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४,५(१) नुसार महिला आरोपी, पारधी नावाचा इसम, देविदास हनवते या तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वपोनि निकाळजे पुढील तपास करीत आहेत.