न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- संतोष सौंदणकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर संघटक चिंचवड विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे वेताळनगर यांच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे नियोजन वेताळनगर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख मजिद शेख, किशोर सातपुते, उपशाखाप्रमुख राजू माशाळकर, महेश शेतसंधी, मुस्तफा शेख, कय्युम पठाण, कलावती नाटेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिंचवड विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी तांबे, बापू मोरे व शिवसेनिक नवनाथ मगर, फुलचंद जाधव, कुदरत खान, दत्तू कसबे, सुदाम कसबे, रफिक बेग, सुनील बोराडे, नामदेव माने, मेहबूब बागवान, अनिल शिंदे, निवृत्ती मोरे, कमलाबाई चव्हाण, अनिता गायकवाड, रेश्मा हिरामण, नितीन तांबे, बाप्पा देडे, रफिक तेलंग, पांडुरंग अडागळे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.















