- साडेतीन लाखांच्या तब्बल सात दुचाकी जप्त; दिघी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- दिघी पोलीस ठाण्याच्या पोलीस तपास पथकाकडुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडुन ३,५५,००० रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी ही कारवाई दाभाडे सरकार चौक, च-होली बायपास रोड, चऱ्होली बु. येथे केली. मनोज मेहतर सोंदरकर (वय ४० वर्षे, व्यवसाय बिगारी, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची गाडी बाबा मिस्त्री याच्याकडुन विकत घेतल्याचे समजले. नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख (वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, चऱ्होली) यालाही ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली. त्याचेकडे तपास केला असता आरोपीकडे सहा दुचाक्या मिळुन आल्या असुन त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक आरोपी यांच्याकडून १) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं. १९०/२०२२ भा.द.वि कलम ३७९, ४११, ३४ मधील २५,०००/- रू. कि. ची होंडा ड्रीम युगा मोटार सायकल नं. एम.एच-१४-ई.जी-५०४६. २) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं २६०/२२ भादवी कलम ३७९ मधील ५०,०००/- रु किमतीची पेंशन प्रो. मोटार सायकल एम.एच-१४-ई-के-०७९७. ३) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं १०३/२३ भादवी कलम ३७९ मधील ६०,०००/- रु किमतीची एक युनिकॉर्न मोटार सायकल एम.एच-१२-एफएच-८६८९ इंजीन. ४) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं ५९९/२३ भादवी कलम ३७९ मधील ५०,०००/- रु किमतीची एक होंडा पेंशन मोटार सायकल एम.एच-१४-बी.डी-३०८२. ५) भोसरी पोलीस ठाणे गुरक्रं ७५८/२३ भादवी कलम ३७९ मधील ५५,०००/- रु किमतीची एक एचएफ डिलक्स मोटार सायकल एम.एच-१४-के.एक्स-४८९४ ६) पिंपरी पोलीस ठाणे गुरनं १११०/२३ भादवी कलम ३७९ मधील ५५,०००/- रु किमतीची एक होंडा शाईन मोटार सायकल एम.एच-१२-एन. आर-०३८५. ७) सांगवी पोलीस ठाणे गुरक्रं ५८८/२३ भादवी कलम ३७९ मधील ६०,०००/- रु किमतीची एक हिरो होंडा पेंशन प्लस मोटार सायकल एम. एच-१४-बी.एन.३५८१. -एकुण ३,५५,०००/- रुपयांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरच्या कारवाईत एकुण ३, ५५,००० रुपये किमतीच्या ०७ मोटारसायकल जप्त करुन सात गुन्हे उघड करण्यात आले असुन गुन्हयातील आरोपी १) नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख, २) मनोज मेहतर सोंदरकर यांना अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई संदिप डोईफोडे पोलीस उपायुक्त, परीमंडळ ०३, विवेक मुगळीकर सहायक पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, मच्छिंद्र पंडित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे, दशरथ वाघमोडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पोउपनी आर. बी. भंडारे, पोउपनि एस.एम. भदाणे व अंमलदार पोहा ७१३ फलके, पोहा ८०१ पोटे, पोहा ९५३ विंचु, पोहा ९११ मुकणे, पोहा १०२० कांबळे, पोहा ११६८ जाधव, पोहा १५७२ जाधव, पोशि २०९४ जाधव, पोशि ३५५३ कसबे व पोशि ३३९१ भोसले यांनी केली आहे.















