- स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- महापालिका पाणीपुरवठा विभागाने या प्रश्नी तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा वेळ वाढवावा अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. याबाबत यादव यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग श्री रामनाथ टकले यांना निवेदन दिले आहे.
त्यात म्हटले आहे कि, आधीच दिवसाआड पाणीपुरवठाने हैराण झालेल्या नागरिकांना कमी दाबामुळे पाणी पुरवठा होत आह. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकवस्ती भागाचा सर्वे करुन वेळ वाढविण्यात यावी. कुदळवाडी परिसरातील पाणीपुरवठा वेळ तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे. यावेळी दिनेश यादव, स्थानिक नागरिक उपस्थित होते.












