- बांधकाम व्यवसायिकाला धमकी; भोसरी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- बांधकाम केलेल्या प्लॉटवरील मालकाच्या नावे असलेला शॉप कस्टमरला कमी किमतीत विकून १० लाख रुपये रक्कम आम्हाला दे, रक्कम नाही दिली तर तुला जिवे ठार मारेल, अशी धमकी आरोपी १ याच्या सांगण्यावरुन आरोपी २ ते ४ यांनी वेळोवेळी फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांना दिली.
हि घटना सप्टेंबर २०२३ पासून दिनांक २१/११/२०२३ रोजी रात्री १.०५ पर्यत बापुजी बुवा मंदिराजवळ, बोपखेल चौक, पुणे येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी स्वप्निल अविनाश घुले (धंदाः- बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी १) अतुल घुले, २) अमोल गिरी, ३) दिवाकर सुरेंद्र सिंग ४) अक्षय गवळी यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांनी ९०२/२०२३ भा.दं. वि. कलम ३८७,३८५,५०४, ५०६, ३४ नुसार आरोपींच्या विरोशात गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र ४ याला अटक केली आहे. पोउपनि जोनापल्ले पुढील तपास करीत आहेत.













