न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- टेम्पो भाडे करारावर लावुन देण्याचे आश्वासन देवुन फिर्यादीकडून आजपर्यंत दोन्ही आरोपींनी मिळून एकूण १४,७५,००० रुपये घेतले. कोणताही भाडेकरार न करता व अप्रामाणिकपणे मिळालेले पैसेही परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.
हा प्रकार (दि. १८/०६/२०२३ ते आजपर्यंत रुपीनगर, तळवडे येथे घडला. फिर्यादी शुभम सुदाम ताकवणे (धंदा – ट्रान्सपोर्ट व्यवसाय) यांनी आरोपी १) शिवशकर श्रिधर कुलकर्णी, २) प्रथमेश कांबळे या दोघांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांनी ७४९/२०२३ भा.दं. वि. कलम ४२०,४०६ प्रमाणे आरोपी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक पुढील तपास करीत आहेत.













