न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोणावळ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान श्रीमती मुर्मू या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेस भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
१९२४ मध्ये स्वामी कुवल्यानंद यांनी जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त योग विषयक काही पुस्तकांचे विमोचन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाश्वर्भूमीवर कैवल्यधाम संस्थेच्या वतीने बुधवारपासून (दी. २९) ‘योगाचा शालेय शिक्षणात समावेश’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.