न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- मोरया सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांची पॉलिसी अॅण्ड इकॉनोमिक अलायंस केअरिंग ऑफ अर्थ या अंतरराष्ट्रीय संघटनेच्या डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र संस्थेचे CEO चिंग सेंग टि यांनी दिले.
या संस्थेस यूनाइटेड नेशन्स ने विशेष सल्लागार म्हणुन यूनाइटेड नेशन्स च्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने 2022 पासून मान्यता दिलेली आहे. डॉ. गणेश अंबिके हे गेली तेरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विषयांवर काम करत असून तेरा वर्षात 44 देशात विविध परिषदेत व्याख्याते, सहभागी,प्रेजेंटेशन ,संयुक्त अभ्यास, इत्यादी साठी सहभागी झाले आहेत.
मोरया सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेस ही युनायटेड नेशन ने वॉटर कॉन्फरन्स(अमेरीका) साठी विशेष मान्यता प्राप्त संस्था म्हणून सहभागी करुन घेतले होते. डॉक्टर गणेश म. अंबिके यांना P.E.A.C.E चे अध्यक्ष चानासन व उपाध्यक्ष व CEO चिंग सेंग टी यांनी निवडीचे पत्र दिले तसेच अभिनंदन केले आहे. त्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी डॉ. गणेश अंबिके यांचा निवडीबद्दल सत्कार केला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप क्रीडा व कला अकादमीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, संजय मराठे, कृष्णकांत फडणीस, प्रदीप सायकर आदी उपस्थित होते.