- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ११५० मीटर लांबीच्या रस्त्याची होणार निर्मिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- सुदुंबरे ते संत तुकारामनगर (ठाकरवाडी) या ११५० मीटर लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच सरपंच मंगलताई गाडे व उपसरपंच बापूसाहेब बोरकर यांच्या करण्यात आले.
या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ८३ लाख २५ हजारांचा निधी मंजूर झालेला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तसेच गावच्या सरपंच मंगलताई कालिदास गाडे व उपसरपंच बापूसाहेब बोरकर, सदस्य ताराचंद गाडे आदींच्या पाठपुराव्यामुळे विकासकामाला निधी मंजूर झाला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सातिका गजशिव, उद्योजक कालिदास गाडे, आजी-माजी सदस्य, तसेच मोहन काळडोके, रामदास गाडे, राजेंद्र गाडे, माधुरी गाडे, वर्षा गाडे, वैजयंता गाडे, सुरेखा गाडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत माणिक गाडे यांनी तर, सूत्रसंचालन सुरेश गाडे आणि आभार सातिका गजशिव यांनी मानले.