न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) पुष्पांजली रावत यांची नियुक्ती झाली आहे. रावत यांनी मावळते सीईओ अमितकुमार माने यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
सीईओ अमितकुमार माने यांनी पुणे दक्षिण मुख्यालयात रक्षा संपदा अधिकारी (डीईओ) म्हणून एक महिन्यापूर्वी कार्यभार स्वीकारला होता. ते सध्या कॅन्टोन्मेंटचे प्रभारी सीईओ म्हणून काम पाहत होते. पुष्पांजली रावत या जम्मू येथे सहायक रक्षा संपदा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.