न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२३) :- चारा-पाण्याची सोय न करता २२ म्हशींना दाटीवाटीने ठेवले. तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा वाहतुक परवाना नसताना जनावराची कत्तल करण्यासाठी त्यांची वाहतुक केली. हा प्रकार (दि. २) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास चाकण बैल बाजारच्या बाहेर, पुणे नाशिक रोडवर, स्पिड ब्रेकरजवळ चाकण येथे घडला.
याप्रकरणी १) जमीर हुसेन शेख, २) पापा फक्रुद्दीन शेख, ३) एम एच ११ ए एल ४५५६ यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात पोलिसांनी १०४१/२०२३ प्राण्याचा छळ प्रतीबंध अधीनियम १९६० कलम ११(१), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ९ ए. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ कलम ८८ अधिनियम कलम प्रमाणे मोटार वाहन अधीनियम १९८९ कलम १७७ गुन्हा दाखल केला आहे. पोहवा निघोट पुढील तपास करीत आहेत.