- सात कोटींचा निधी उपलब्ध; रस्त्याच्या कामाला प्रारंभ..
- दळणवळणास गती मिळणार; आ. सुनील शेळकेंचा पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२३) :- आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळातील नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या गावांना भंडारा डोंगराच्या मागील बाजुने जोडणारा ग्रामीण मार्ग-५४ रस्त्यासाठी सुमारे सात कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार (दि. ३) संपन्न झाला.
या कार्यक्रमास सुदवडी गावचे उपसरपंच वैभव गाडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब कराळे, आकाश गोतारणे, वैशाली शिंदे, प्रिती शिंदे, सायली कराळे, गोरक्षनाथ गाडे, किसनराव कराळे,संचालक गजानन कराळे,नारायण मालपोटे, दिनेश चव्हाण,बाळासाहेब कराळे,नेहा शिंदे, नितीन ताठे,रमेश कराळे,दत्तात्रय कराळे, सुरेश शिंदे,सुखदेव कराळे, बाबाजी खेडेकर,रमेश बाळसराफ, राष्ट्रवादी काँग्रेस गाव अध्यक्ष ज्ञानोबा कराळे,संतोष ताठे,अशोक गाडे, सतीश काळे,अवतार शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. कच्चा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील कमी झाली होती. परंतु जांबवडे, सुदवडी परिसरात नागरीकांनी छोटी-मोठी घरे बांधल्याने या भागातील नागरिकीकरण वाढत आहे. तसेच या परिसरात ठाकरवस्त्या असल्यामुळे येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने हा रस्ता होणे आवश्यक होते.
उपलब्ध झालेल्या निधीतून ३.७५ मीटर रुंदीचा सुमारे सात किलोमीटरपेक्षा अधिक रस्ता होणार असून साईटपट्ट्या देखील करण्यात येणार आहेत. आवश्यक ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील दळणवळणास गती मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“सुदवडी, जांबवडे परिसरात प्लॉटधारक रहिवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. हा नवीन रस्ता झाल्यानंतर गावांच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी भरघोस निधी दिल्याने पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.”
– लोकनियुक्त सरपंच सुमित कराळे…