न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२३) :- सायकलवर कामास जात असताना सकाळी ०६.३० च्या सुमारास आरोपी कंटेनर चालकाने फिर्यादीच्या ६० वर्षीय वडीलांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्यांच्या मृत्युस कारणीभुत होवुन पळुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा अपघात (दि. ०९) रोजी सकाळी वाकड वाहतुक विभागासमोर भुमकर चौक, हिंजवडी येथे घडला. फिर्यादी योगेश नंदकिशोर खैरनार यांनी आरोपी कंटेनगर गाडीवरील चालक रोशन लाल पटेल (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी १३८०/२०२३ भांदवि कलम २७९, ३०४ (अ) मो.वा.का कलम-१८४, १३२ (१)(क), ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि खारगे पुढील तपास करीत आहेत.












