- पिंपळे सौदागरच्या कॅपीटलमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२३) :- १ लाख गुंतवणूक केल्यास महिना १५,००० रुपये जास्तीचा परतावा, असे १२ महिन्यांतर एकूण २,८०,००० रुपये आकर्षक परतावा देणाऱ्या स्किमचे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना एकूण ३५,००,००० रुपये रक्कम आर.बी. कॅपीटल या संस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आजपर्यंत फक्त १३,७०,००० रुपये मूळ मुद्दल रक्कम परत देवून इतर कोणताही नफा/परतावा/लाभांश न देता फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेतील उर्वरित २१,३०,००० रुपये मूळ मुद्दल रक्कमेचा स्वतःच्या फायदयाकरीता वापर करुन फिर्यादीची आरोपीने आर्थिक फसवणूक केली.
तसेच सुरेश गुरुनाथ जीगलुर (रा. हुबळी) यांच्याकडुन देखील २ कोटी ८५ लाख रक्कम स्वीकारुन त्यांचीदेखील फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हि घटना एप्रिल २०२१ पासून ते आजपर्यंतच्या कालावधीत आर. बी. कॅपीटल, पिंपळे सौदागर येथे घडली.
फिर्यादी विकास रामराव मिरटकर यांनी आरोपी ऋषिकेश आप्पा भोसले यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात ६५०/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि शेलार, आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत.












