न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरीतील वायसीएम हॉस्पीटलमध्ये आयसीयु वार्ड येथे फिर्यादी डॉक्टर हे रुग्णावर वैदयकिय उपचार करीत होते. पेशंट हे उपचारादरम्यान मयत झाले. सदरची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी दिली. दरम्यान पेशंटचा मुलगा आरोपी हा वार्डमध्ये आला. त्याने फिर्यादीकडे पेशंटच्या मयताबाबत विचारपुस केली.
मयत वडीलांकडे जावुन तेथे थोडावेळ रडला. फिर्यादी हे शासकिय कर्तव्य करीत असताना आरोपीने रागारागत फिर्यादीकडे येवुन मोठ्याने ओरडुन फिर्यादीचा हात पकडुन हातास हिसका देवुन फिर्यादीच्या गालात दोन चापटा मारुन अश्लिल शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हि घटना (दि. १०) रोजी दुपारी २.११ वाजता घडली.
फिर्यादी डॉ. ऋषीकेश हनमंत कुदळे यांनी आरोपी महेश राजाराम कुंभार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ११९७ /२०२३भा.द.वि कलम ३५३,३३२,५०४ महाराष्ट्र वैदयकिय सेवा व्यक्ती आणि वैदयकिय सेवा संस्था ( हिंसक कृत्य व मालमत्तेचे हानी यांना नुकसान व प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहा पोलीस निरिक्षक कैलासे पुढील तपास करीत आहेत.












