- हजारो भाविकांनी घेतले महाराजांचे दर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२३) :- तीर्थक्षेत्र सुदुंबरेत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शुकवारी (दि. ८) रोजी उत्साहात साजरी झाली. सकाळच्या सुमारास महाराजांची पूजा आणि अभिषेक संपन्न झाला.
त्यानंतर महाराजांची आरती आणि पुष्पहार अर्पण करून नैवैद्य दाखविण्यात आला. दिवसभर हरीभजन सुरु होते. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने भक्त-भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत होते.
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, मुख्य चिटणीस अॅड. राजेश येवले, खनिजदार दत्तात्रय शेलार, उपाध्यक्ष पोपटराव पिंगळे, विजयकुमार शिंदे, चिटणीस लक्ष्मण शेलार, सतीश वैरागी, प्रशांत भागवत, शैलेश मखामले, भिकाजी भोज, पंडित पिंगळे, महिला चिटणीस विमल वाव्हळ, व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, विद्या जाधव, अंजली जाधव, अबोली जाधव, सुमन शिजुळ, सचिन काळे, संतोष काळे, छ. संभाजीनगर येथील बाभूळगावचे दिंडी प्रमुख बबन गायकवाड, अशोक शेटे, लक्ष्मण वाघचौरे, बाळू तुपे, बाळनाथ महाराज, गोरख गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रमेश गायकवाड, काशिनाथ गायकवाड, वाल्मिक जाधव, कचरू सोनवणे, वाल्मिक कडवे, गोरख पवार, जमदाडे, अशोक सोनवणे, दादा पवार, कल्पेश गायकवाड, रावसाहेब बडे , बाबासाहेब गायकवाड, सखाराम गायकवाड, बंडू गायकवाड, अरुण तुपे, किशोर पवार, निर्मला तुपे, अर्चना तुपे, आदी उपस्थित होते.