न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२३) :- खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या हददीतील जमिनीत संगणमत करून आरोपींनी एकूण ५० गुंठे शेत जमिनीचे फिर्यादीचे कधीही न रद्द होणारे कलमुखत्यारपत्र तसेच साठेखत करून दिले असता फिर्यादीच्या संमतीशिवाय तसेच फिर्यादीचा विश्वासघात करून इसमास रजिस्टर करारनामा करून विक्री करून आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ०४/०८/२०२३ ते २५/१०/२०२३) दरम्यान घडला. फिर्यादी योगेश बाळासाहेब काकडे यांनी आरोपी १) बंकटसिंग रामसिंग परदेशी, २) सुरेषसिंग बाबुसिंग परदेशी, ३) विठठ्लसिंग बाबुसिंग परदेषी ४) अमितसिंग अनिलसिंग परदेषी उर्फ गणेष परदेषी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी ३२०/२०२३ भादंवि कलम ४२०,४०६, ३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि गोडसे पुढील तपास करीत आहेत.













