न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२३) :- सदनिका घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून एकुण २५ लाख रुपये ऑनलाईन, रोखीने घेतले. मात्र, सदर सदनिका ही फिर्यादी न विकत परस्पर इतरांना विक्री केली. फिर्यादी यांच्या २५ लाख रुपये रक्कमेपैकी १२ लाख ५० हजार रुपये त्यांना देवुन उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये रक्कम परत न देता व सदर सदनिकेचा ताबा न देता फिर्यादीचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सन २०१८ पासुन ते दि १४/१२/२०२३ पर्यंत समृध्दी वर्षा बिल्डींग, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सुरज विश्वनाथ पाटील यांनी आरोपी सुधीर विष्णु वाडेकर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ६५१/२०२३ भा द वी कलम ४०६,४२०, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मोरे पुढील तपास करीत आहेत.













