न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १७ डिसेंबर २०२३) :- देहूलगत असणारे येलवाडी, सुदुंबरे, सुदवडी गावात थंडी वाढत चालली आहे. रविवारचे किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे, पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरण, धुके आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता.
सकाळी नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडताना दिसत होते. तसेच ठिकठिकाणी शेकोटी पेटविलेली दिसत आहे. शालेय विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडत जावे लागत आहे. रस्त्यात शेकोटी दिसताच विद्यार्थी उबेसाठी शेकत बसतात. पुढील चार दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.













